![]() |
Post Office Recruitment |
Post Office Recruitment : भारतीय पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) 30,041 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 23 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत आहे.
सामान्य, EWS, OBC, SC, ST आणि PWD सारख्या विविध श्रेणींमध्ये रिक्त जागा वितरीत केल्या जातात ज्यामध्ये उमेदवारांसाठी मोठ्या संख्येने जागा उपलब्ध आहेत. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100, तर SC,ST आणि महिला अर्जदारांना अर्ज शुल्कातून (GDS Recruitment) सूट देण्यात आली आहे.
GDS साठी पात्रता निकष (GDS Eligibility)
GDS पदासाठी उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे, मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. त्या बरोबर अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा आणि त्याला कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय समस्या नसावी.
GDS साठी पगार (GDS Salary)
यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ग्रामीण डाक सेवक म्हणून नियुक्त करण्यात येते आणि त्यांना 12000 रुपये पगार (मासिक वेतन) मिळेल. सरकारी नोकरी असल्याने GDS कर्मचार्यांना पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि वैद्यकीय सुविधांसारखे अनेक फायदे देखील मिळतील.
ऑनलाइन अर्ज (Post Office Tecruitment Apply)
- भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर indiapostgdsonline.gov.in जा .
- GDS Recruitment 2023 या लिंक वर क्लिक करा.
- पात्रता निकष आणि इतर महत्वाची माहिती समजून घेण्यासाठी जाहीर सूचना काळजी पूर्वक वाचा.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी “Apply Online” किंवा “नोंदणी” या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा, जसे की वैयक्तिक महिती, शैक्षणिक महिती आणि संपर्क माहिती.
- मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरींच्या स्कॅन करून अपलोड करा.
- लागू असल्यास अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट (Submit) करा.
- शेवटी अर्ज जमा करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासण्याची खात्री करा.
- यशस्वीपणे अर्ज जमा केल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट घ्या. भरती (IndiaPost GDS Online) प्रक्रियेसंबंधी इंडिया पोस्टकडून कोणत्याही नव्या सूचनांकडे लक्ष ठेवा.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?