Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना, या योजनेत गुंतवणूक करून मिळवा 65 लाख रुपये. - Kisan Wani

Wednesday, July 26, 2023

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना, या योजनेत गुंतवणूक करून मिळवा 65 लाख रुपये.

Sukanya-Samriddhi-Yojana
Sukanya Samriddhi Yojana 

Sukanya Samriddhi Yojana : देशातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ती 'सुकन्या समृद्धी योजना' (SSY) म्हणून ओळखली जाते. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) या अभियानांतर्गत ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत सहभागी झाल्याने पालकांना त्यांच्या मुलीचं शैक्षणिक खर्च किंवा लग्नापर्यंतचा खर्च उचलण्यास मदत होणार आहे. या योजनेमध्ये सहभागी झाल्यास तुम्हाला 7.6 टक्के व्याज (Interest Rate) मिळेल.


    मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेचा लाभ मुलीला दिला जातो. मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेची खूप मदत होईल, असा या योजनेचं मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. कधीही न चुकवता या योजनेच्या खात्यात (Account) पैसे भरत राहिल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर लाभार्थीला 71 लाख रुपये मिळू शकतात. शिवाय मुदतीनंतर मिळणारी रक्कम करविरहित (Tax Free) आहे.


सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे 

    'सुकन्या समृद्धी योजना' 18 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी आहे. या आगोदर ही मर्यादा 10 वर्षे होती. मात्र, सरकारने यात बदल करून 18 वर्षे केली आहेत. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याज दिला जातो (Sukanya Samriddhi Yojana Interest Rate).

    आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट देखील दिली जाते. ठेव, व्याज आणि पूर्ण रक्कम करमुक्त आहेत.

योजनेसाठी पात्रता (Sukanya Samriddhi Yojana)

    मुलीच्या जन्मानंतर 10 वर्ष्याच्या आता हे खातं उघडणं (SSY Account Opening) बंधनकारक आहे. अर्जदार भारताचा नागरिक असणंही गरजेचे असून खातं फक्त मुलीच्या नावानंच उघडलं जाऊ शकतं.

    या योजनेसाठी 250 रुपयांसह खातं उघडावं (Account Opening) लागेल. त्यानंतर वर्ष दीड लाखांपर्यंत त्या खात्यात पैसे जमा करता येईल.

महत्त्वाची कागदपत्रे

  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
  • मुलीचा आधार कार्ड.

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं (How to open SSY account)

    तुमच्या गावातील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडू शकता. खातं उघडण्याआधी तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवरून त्यासंबंधीचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.

    अर्जातील सर्व माहिती भरा. त्यानंतर सर्व कागदपत्र अर्जसोबत जोडावी लागतील. सर्व कागदपत्रं अर्ज बरोबर जोडल्यानंतर ते अर्ज पोस्ट ऑफिसकडे सबमिट करा.

    अर्ज बरोबर खाते उघडण्याची किमान रक्कम द्या. ही रक्कम, रोख किंवा चेक  स्वरूपात देऊ शकता.

    या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून देखील पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस, खासगी व सार्वजनिक बँकेत या बद्दलची सर्व माहिती उपलब्ध आहे.

    हे बचत खातं कुठल्याही बँकेत उघडलं जाऊ शकतं. तसंच, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खातं ट्रान्स्फर देखील करू शकत. 

अटी आणि नियम  (Sukanya Samriddhi Yojana)

    सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात कमीत कमी रक्कम 250 रुपये डिपॉझिट केली नाही, तर अकाऊंट 'डिफॉल्ट अकाऊंट' (Default Account) म्हणून ग्राह्य धरला जाईल. मात्र, हे अकाऊंट पुन्हा सुरू करण्यासाठी 250 रुपये आणि अधिकचे 50 रुपये भरून लागतील. भरून पुन्हा सुरू केला जाऊ शकता.

    मुदतीच्या आता अकाऊंट तेव्हाच बंद होऊ शकते  जर गंभीर आजाराचं कारण असेल किंवा वैद्यकीय गंभीर कारण असेल.

या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी (Contact US) 18002666868 या नंबरवर संपर्क करू शकता.


सुकन्या समृद्धी योजना काय आहे ?
    Sukanya Samriddhi Yojana ही केंद्र शासनाची (Central Government) योजना आहे. या योजनेचं मुख्य उद्देश मुलीच्या भविष्यातील शैक्षणिक खर्च आणि लग्नाच्या खर्चासाठी बचतीला प्रोत्साहन देणे आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं ?
    पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रे देऊन सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय ?
    सुकन्या समृद्धी योजनेत चांगलं व्याजदर, कर सूट आणि मुलींच्या भविष्यातील कल्याणासाठी सुरक्षित बचत. शैक्षणिक आणि विवाह खर्च सुरक्षित करण्यात मदत करते.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी किमान आणि कमाल ठेव 
    किमान ठेव रक्कम ₹250 आहे आणि जास्तीत जास्त वार्षिक ठेव मर्यादा ₹150,000 आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?