Poultry Farming Loan : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50% अनुदानावर 50 लाखापर्यंत कर्ज मिळणारं ? - Kisan Wani

Thursday, July 27, 2023

Poultry Farming Loan : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50% अनुदानावर 50 लाखापर्यंत कर्ज मिळणारं ?

Poultry-Farming
Poultry Farming

Poultry Farming : ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी केंद्र शासन 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंत कर्ज देणार आहे. काय आहे योजना, योजनेची पात्रात आणि अर्ज कसा करायचा या संबधी सर्व माहिती समजून घेऊ.


    केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (Animal Husbandry Department) खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मांस, दूध आणि अंडी यांचं उत्पादन वाढविण्याच्या उद्देश्याने ही योजना सुरु करण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात देशात 129 अब्ज अंड्यांचं उत्पादन झालं. केंद्र शासनाला हे उत्पादन अजून वाढवायचं आहे.


काय आहे ही योजना ? (Poultry Farming Scheme)

    ग्रामीण भागात कुक्कुट पालन सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाईल. यावर 50 टक्के अनुदान मिळेल.

उदाहरणार्थ : जर तुम्ही 50 लाखाचं कर्ज (Loan) घेतलं तर तुम्हाला त्यातील 25 लाख परत द्यावे लागतील. पण हे पैसे त्या संबधित बँकेत दोन हप्त्यांमध्ये रक्कम जमा करावे लागतील.

कर्ज कोणाला मिळू शकतं ?  (Poultry Farming Loan Scheme)

    या योजनेअंतर्गत बचत गट, उद्योजक, शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या संस्था यानं कर्ज दिला जाईल. या योजनेसाठी कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देते.

अर्ज कसा करायचा ? (Poultry Farming Loan Apply)

    या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी शासनाने खास राष्ट्रीय पाळीव पशू मिशन वेबसाईट (नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन पोर्टल) सुरु करण्यात आला आहे.

    कर्ज घेणाऱ्याच्या नावावर किमान एक एकर शेतजमीन असणे बांधकारक आहे. यासंबंधित कागदपत्र अर्ज बरोबर जोडावी. जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर लीजवर घेतलेल्या जमिनीवर देखील कर्ज घेता येतं पण अशा वेळेस हे कर्ज तुम्ही आणि जमीन मालक दोघांच्या नावाने देण्यात येते.

    या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याआधी एक सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. 

कोणती कागदपत्रं लागतात ? (Poultry Farming Loan Documents)

 • संपूर्ण प्रकल्प अहवाल
 • आधार कार्ड
 • पोल्ट्री फार्म उभं करायचं त्या जागेचे फोटो
 • जमिनीची कागदपत्रं
 • पॅन कार्ड
 • मतदान ओळखपत्र
 • बँकेत खात्याचे दोन कॅन्सल चेक
 • रहिवासी दाखला
 • आवश्यक फॉर्म
 • जात प्रमाणपत्र (गरजेचे असल्यास)
 • कौशल्य प्रमाणपत्रं
 • सही
    
    सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यनंतर नॅशनल लाईव्हस्टॉक वेबसाईट वर जाऊन आपला यूझर आयडी आणि पासवर्ड बनवावा. अधिक माहितीसाठी www.nlm.udayanidhimitra.in/Login portal या वेबसाईटला भेट द्या.

अर्ज करताना काय काळजी घ्यावी ?

    तुम्ही लॉगिन करताना तुम्हांला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. आपली सर्व कागदपत्रं व्यवस्तिस्था असावीत ही काळजी घ्यावी. त्याबरोबर नक्की किती कर्ज पाहिजे हे अर्ज करतानाच नमूद करावं.

    तुमचा प्रकल्प अहवाल (Poultry Farming Project Report) सर्वात महत्त्वाचा आहे. यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत, त्यासाठी किती खर्च येणार, त्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी किती खर्च येणार हे सगळं त्यात नमूद केलेलं असावं. सर्व माहिती खरी असावी.

    पडताळणी दरम्यान माहिती खोटी आढळल्यास तुमचं अर्ज रद्द करण्यात येईल शकतो.

सिबील स्कोर कसा असावं ? (Loan Cibil Score)

    या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबील स्कोर चांगला असणं गरजेचे आहे. सिबील स्कोर चांगला नसल्यास बँका तुम्हाला कर्ज देणार नाहीत.

प्रशिक्षणाची आवश्यकता ?

    कुक्कुटपालन हा चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण असणं अत्यंत अतिशय आवश्यक ठरतं. कोंबड्यांची निगा कशी राखावी, त्यांना रोगापासून कसं दूर ठेवावं, त्यांना काय खायला द्यावं ही सगळी सर्व माहिती असे आवश्यक आहे.


कुक्कुट पालनासाठी किती कर्ज मिळू शकेल ?
    कर्जाची रक्कम व्यवसायाच्या गरजांवर अवलंबून असते आणि केंद्र शासनाकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाईल. यावर 50 टक्के अनुदान मिळेल.

कुक्कुट पालनासाठी कोणती बँक कर्ज देते ?
    कुक्कुट पालनासाठी अनेक बँका कर्ज देतात, त्या पैकी HDFC बँक, SBI, PNB, फेडरल बँक, IDBI बँक, ऍक्सिस बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इ.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?