PM Kisan 14th Installment : पीएम किसान सन्मान निधीचा वा हप्ता कधी मिळणार, तपासा लाभार्थी स्थिती. - Kisan Wani

Monday, July 24, 2023

PM Kisan 14th Installment : पीएम किसान सन्मान निधीचा वा हप्ता कधी मिळणार, तपासा लाभार्थी स्थिती.

PM-Kisan-14th-Installment
PM Kisan 14th Installment

PM Kisan 14th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता कधी मिळणार याची सर्व शेतकऱ्यानं प्रतीक्षा आहे. PM किसान सम्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबाबतची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. येत्या 27 जुलैला PM Kisan 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. 


    27 जुलै रोजी योजनेचं 14 व्या हप्त्याचे (14th Installment) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  वाटप करण्यात येणार आहे. देशातील 8.5 कोटी पेक्षा आधी शेतकऱ्यांना  PM किसानचा 14 वा हप्ता मिळणार आहे. या योजनेचा 13 व्या हप्ता (13th installment) 27 फेब्रुवारी रोजी वितरित केला होतो. आता 14 व्या हप्ता 27 जुलैला शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 14 हप्ता (PM Kisan 14th Installment)

    काही शेतकऱ्यानं पीएम किसान योजनेचं 14वा हप्ता मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना13 वा हप्ता मिळाला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी झालेले नाही. या शेतकऱ्यांना 14 हप्ता मिळणार नाही. या बरोबर आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर त्यांना 14 वा हप्ताही मिळणार नाही. 

आवश्यक कागदपत्रे (PM Kisan Documents)

    पीएम किसान (PM Kisan) योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे गरजेचे आहेत. 
 • आधार कार्ड
 • बँक खाते
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • उत्पन्नाचा दाखला
 • जमिनीची कागदपत्रे


यादीत तुमचे नाव तपासा (PM Kisan Beneficiary Status)

    पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता त्यांच्या खात्यात येणार की नाही या बदल शेतकरी संभ्रमात आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे नाव लाभार्थी यादीत पाहता येणार आहे.

 1. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. 
 2. वेबसाइटवरती 'Beneficiary Status' या पर्याय वर क्लिक करा. 
 3. आता तुमचा मोबाईल क्रमांक किंवा तुमच्या योजनेचा नोंदणी क्रमांक टाका. 
 4.  "Captcha" कोड टाका आणि सबमिट (Submit) बटणावर क्लिक करा. 
 5. आता तुमचे स्टेटस तुमच्या स्क्रीनवर दिसेल. 
 6. 14 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येतील की नाही हे देखील तुम्हाला कळेल. 


ऑनलाईन ई-केवायसी  (PM Kisan KYC)

    आता इथून पुढच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्यांसाठी केंद्र सरकारनं ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शेतकरी स्वत: पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून आपली ई-केवायसी करू शकतात.

 1. ऑनलाइन केवायसी (KYC) करण्यासाठी, तुम्हाला सर्वात प्रथम PM-Kisan Samman Nidhi योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
 2. या वेबसाइटवर तुम्हाला E-KYC हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 3. E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, शेतकऱ्याचं आधार नंबर (Aadhar number) टाईप करावा लागेल.
 4. यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP इथे टाका आणि "Submit " बटणावर क्लिक करा.
 5. आता तुमचे केवायसी पूर्ण होईल.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा (Apply for PM Kisan Yojana)

 1. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. 
 2. न्यू फार्मर्स (New Farmer Registration) रजीस्ट्रेशनवर क्लीक करा. 
 3. आधार नंबर टाकून "Captcha" भरावा. 
 4. सर्व वैयक्तिक माहिती भर. 
 5. "yes" वर क्लीक कर. 
 6. माहिती सेव्ह (Save) करावी आणि प्रिंट (Print ) काढून ठेवू शकता.

    या योजनेअंतर्गत केंद्र शासन प्रति वर्षा सहा हजार रुपये देते. राज्य शासनही देखील सहा हजार रुपये देणार आहे. अशी घोषणा करण्यात आली. परंतु , राज्य शासनाची मदत कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. शेतकरी राज्य शासनाची मदत कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत प्रति वर्ष 12 हजार रुपये मिळणार आहेत.

येथे संपर्क करा

    पीएम किसान योजनेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी pmkisan-ict@gov.in वर मेल करू शकतात. किंवा योजनेच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर- 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर कॉल करू शकता.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?