![]() |
Kisan Credit Card Scheme |
Kisan Credit Card : देशातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज (Short Term Loan) दिले जाते, जेणेकरून ते शेतीसाठी लागणारे उपकरणे खरेदी करू शकतील आणि इतर खर्च उचलू शकतील.
शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर जास्ती व्याज द्यावे लागत नाही, त्यांना अतिशय कमी व्याजाने कर्ज मिळते. आम्ही तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता या बद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? (What is a Credit Card)
किसान क्रेडिट कार्डचे फायदे (Features of Kisan Credit Card)
- या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 4% व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
- जर किसान क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या जोखमीच्या बाबतीत 25,000 रुपयांपर्यंत विमा दिला जातो.
- पात्र शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्ड बरोबर बचत खाते दिले जाते, ज्यावर त्यांना चांगल्या दरात व्याज देखील मिळतो, या सोबतच त्यांना स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्ड देखील दिले जाते.
- कर्जाची परतफेड करण्यासाठी देखील चांगली सवलत दिली जाते. कर्ज वाटप देखील सोप्या पद्धतीने केले जाते.
- हे क्रेडिट कार्ड त्यांच्याकडे 3 वर्षे राहते, पीक काढल्यानंतर शेतकरी त्यांचे कर्ज फेडू शकतात.सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण भरावे लागणार नाही.
किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता ? (Who can apply for Kisan Credit Card)
- यामध्ये स्वतंत्र श्रेणी निर्माण केलेली नाही. जर तुम्ही शेत जमिनीचे मालक असाल आणि शेतीत करत असाल तर या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड काढू शकतात.
- भाडेकरू शेतकरीही या साठी अर्ज करू शकतात. या अंतर्गत भाडेकरू शेतकऱ्यानं देखील कर्ज दिले जाते.
- किसान क्रेडिट (KCC) कार्डसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असावे.
किसान क्रेडिट कार्ड कुठे मिळेल
- सहकारी बँक.
- प्रादेशिक ग्रामीण बँक.
- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
- स्टेट बँक ऑफ इंडिया.
- बँक ऑफ इंडिया.
- इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया.
किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents for Kisan Credit Card)
- भरलेला अर्ज
- ओळखपत्र : यामध्ये तुम्ही पॅनकार्ड किंवा आधार कार्ड काही ही देऊ शकता.
- पत्ता पुरावा : आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र या मध्ये देता येईल.
- जमिनीची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक इतर काही कागदपत्रे देखील मागू शकते.
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा ? (Apply for Kisan Credit Card)
- किसान क्रेडिट कार्डसाठी दोन पद्धतींनी अर्ज करू शकता.
ऑनलाइन प्रक्रिया (Kisan Credit Card Online Application)
- तुम्हाला ज्या बँकेत अर्ज करायचा आहे. त्या बँकेच्या अधिकृत ऑनलाइन वेबसाइटवर जा.
- यामध्ये तुम्हाला दिलेल्या पर्याय त्यापैकी किसान क्रेडिट कार्डचा पर्याय निवडा.
- "Apply" या पर्यायावर क्लिक करा, आता तुमच्या समोर ऑनलाईन अर्ज दिसेल.
- येथे तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरावी आणि अर्ज 'Submit' वर क्लिक करा.
- बँकेकडून तुम्हाला संदर्भ अर्ज क्रमांक पाठवला जाईल.
- तुमचं अर्ज पात्र असल्यास, तर बँकेद्वारे तुमच्याशी 3 - 4 दिवसांत संपर्क केलं जाईल.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?