![]() |
Will it rain today |
Will it rain today : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात 6 तसेच 7 मार्चला काहीठिकाणी विजयाच्या कडकडाट, मेघगर्जना, मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Rain Weather) शक्यता वर्तविला आहे. याबाबतचा अंदाज वनामकृविच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने वर्तविला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा शनिवारी पाऊस होईल, तर 7 मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Will it rain today
जालना जिल्ह्यात 7 मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात 7 मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात 5 ते 7 मार्चदरम्यान काहीठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Rain Weather) शक्यता आहे.
वाऱ्याचा वेग राहणार अधिक
मराठवाड्यात पुढील 5 दिवस वायाचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 3 ते 9 मार्चदरम्यान पाऊस सरासरी एवढा ते सरासरीपेक्षा जास्त व कमाल व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. वनामकृविच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने हा हवामान (Weather) अंदाज दिला आहे..
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?